
रेल्वे स्टेशन येथे अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी
रत्नागिरी ः रेल्वे स्टेशन -गृहनिर्माण सोसायटी समोरिल रस्त्यावर १३ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने स्वतःकडे बाळगणाऱ्या दोन संशयिताना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुहाफीज यासीन सोलकर (३०), व फुरकान पाशा जागीरदार २८ (दोघेही रा. न्यु कर्ला, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. २०) रात्री नऊच्या सुमारास प्रीतम गृहनिर्माण सोसायटी समोरील रस्त्यावर घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलल्या कारवाईत संशयितांकडे १३ ग्रॅम वजनाचा ब्रऊन हेरॉईन व ११२ ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ विक्री करण्याचा उद्देशाने सापडला होता. या प्रकरणी पोलिस हवालदार राहूल जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली. न्यायालयाने सोमवारी (ता. २३) पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.