
स्थानिक व्यावसायिकाकडून गुटखा खरेदी केल्याचे उघड
चिपळूण:- शहरातील मुरादपूर-भोईवाडी येथे गुटखा प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर हा गुटखा स्थानिक व्यावसायिकाकडून विकत घेतला होता. तसेच सध्या हा व्यावसायिक अटकेत असून त्याने हा गुटखा परजिल्ह्यातून आणल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे येत आहे.
या गुटख्याप्रकरणी प्रथमेश रवींद्र शेडगे, स्वप्निल गंगाराम मोरडेकर या दोघांना अटक करण्यात आली असून सोमवारपर्यंत त्याना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमेश शेडगेने विक्रीच्या उद्देशाने त्याच्या घराच्या पडवीत गुटख्याचा साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. यानुसार या पथकाने टाकलेल्या धाडीत प्रथमेशकडून ४३ हजार ५०० रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याने. हा गुटखा स्थानिक व्यावसायिक असलेला स्वप्निल मोरडेकर याच्याकडून विकत घेतल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे येत आहे. मोरडेकर यालाही अटक करण्यात आली आहे. मोरडेकरने हा गुटखा परजिल्ह्यातून आणल्याची माहितीही पुढे येत.. दरम्यान, मोरडेकरने हा गुटखा आणखी कोणाला विकला, त्यात कोणा- कोणाचा समावेश आहे, हे देखील पोलीस तपासातून पुढे येणार आहे.