
पटवर्धनच्या किमया जाधवची रायफल शुटींग मध्ये किमया !
रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कुलच्या किमया प्रशांत जाधव हिने शालेय पिस्तूल शुटींग खेळ प्रकारात रौप्यपदक पटकावून किमया करून दाखविली आहे. तिने दाखविलेल्या कामगिरीमुळे तिची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
किमया प्रशांत जाधव ही पटवर्धन हायस्कूल येथे इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेत आहे. किमया खेलो इंडिया ची बॅडमिंटनपटू असून ती ॲबॅकस मध्ये देखील पारंगत असल्याचे समजते . एज्युकेशन ॲण्ड स्पोर्टस प्रमोशन फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष व मायबाप बालसेवा फाऊंडेशनचे मुख्य प्रवर्तक प्रशांत जाधव तसेच पुष्कराज स्पोर्टस शुटींगअकॅडमी चे मुख्यप्रशिक्षक पुष्कराज इंगवले सौ. राजेश्वरी इंगवले यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ नमिता कीर ,मुख्याध्यापिका सौ घाटविलकर क्रीडा शिक्षक श्री गुरव यांनी किमयाच्या यशाबद्दल कौतुक केले आहे .सदर स्पर्धेतील यशानंतर दि. २१ व २२ रोजी किमया पालघर असोसिएशनच्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळत आहे. यामध्ये जिल्हयातून सुमारे २२ स्पर्धक सहभागी झाले आहेत .