
आजाराला कंटाळून वृध्देची आत्महत्या
लांजा : सततच्या आजाराला कंटाळून ७० वर्षीय महिलेने घराच्या पडवीत साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार २० सप्टेंबर रोजी पहाटे पुनस वरचीवाडी येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनस वरचीवाडी येथे राहणारी ताई गोपाळ चाफडे (वय ७०) या गेल्या काही वर्षांपासून आजाराने त्रस्त होत्या. सततच्या आजाराने त्रस्त झाल्याने शुक्रवारी पहाटे ६ वाजता राहत्या घराच्या पडवीमध्ये साडीने गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. सकाळी ही घटना लोकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. या प्रकरणी लांजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.