
महिलेला शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी ; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून शिवगाळ व ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन रामचंद्र चिकोडीकर (रा. सहजीवन सोसायटी उत्कर्ष नगर, कुवारबाव, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १७) रात्री साडेआठच्या सुमारास सहजीवन सोसायटी उत्कर्षनगर, कुवारबाव येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा घरी आला असताना फिर्यादी निलिमा लखन चिकोडीकर (वय २७, रा. कुवारबाव रत्नागिरी) यांनी संशयिताच्या अफेअर बाबत विचारणा केली. याचा राग येऊन संशयिताने त्यांना शिवागाळ व मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्याचा राग मनात धरुन फिर्यादी मद्य प्राशन करुन घरी आला व फिर्यादी यांना माझ्या विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिलीस का असे बोलून शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी निलिमा चिकोडीकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.