
बहिरवलीत घरफोडी, अज्ञात चोरट्यावर गुन्हा
खेड : बहिरवली मोहल्ला येथे घर फोडून चोरट्याने ९,३०० रुपये किंमतीची भांडी लांबवली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाडीपट्ट्यात बंदावस्थेतील घरातून भांडी लंपास करण्याचे प्रकार वाढले आहेत.
या बाबत इक्बाल हुसैन अली चौगुले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ते व त्यांची पत्नी चिपळूण येथे वास्तव्यास असतात. त्यांची वयोवृद्ध आई बहिरवली येथे राहते.ती जेवणासाठी शेजारील नातेवाईकांकडे गेली असता चोरट्याने घराच्या माळ्यावर गोण्यांमध्ये असलेली भांडी लांबवली. घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत मुलाला कळवले. त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.