जादा बुकींग रक्कम पाठवल्याचे सांगून फसवण्याचा प्रयत्न
गुहागर:- ऑनलाईन फसवणुकीचे नव-नवीन प्रकार समोर येत असून गेले महिनाभर एक व्यक्ती वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून हॉटेल, लॉज व होमस्टेमध्ये रूम बुकींगचा फोन करत आहे. रूम बुकींगकरिता पाठवाव्या लागणाऱ्या स्कमेपेक्षा १० पट जादा रक्कम आपण टाकली असल्याचे सांगत तसा बनावट ‘स्क्रिन शॉट’ दाखवत उर्वरित रक्कम परत मागून फसवण्याचा अनोखा स्कॅम एक भामटा करत आहे. यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना एकमेकांना केल्या जात आहेत.
सदर व्यक्ती सुरूवातीला संबंधित हॉटेल, लॉज व होमस्टे धारकांच्या व्हॉटसअॅप नंबरवर काही तारखांना रुम मिळेल का असा मॅसेज टाकत आहे. त्यानंतर मोबाईलवर फोन करून रुमची माहिती घेऊन बुकींग रक्कम कितीही असूदे तातडीने टाकतो असे सांगून बुकींग नक्की करत आहे. काही वेळाने तो जी बुकींग रक्कम असते त्या १० पंट रकमेचे स्कमेवर एक शून्य आमीष वाढवून तब्बल दहापट दाखवणारा भामटा कार्यरत. रक्कम आपण फोन पे केल्याचा स्क्रीन शॉट पाठवतो. सदर पाठवलेल्या स्क्रीनशॉटवर युपीआय आयडी, वेळ, संबंधित हॉटेल, होमस्टे यांचे नाव सर्व काही खरे असल्याचे भासवून बोगस इमेज पाठवत आहे. लगेचच चुकून आपली जादा रक्कम गेली असून बुकींग रक्कम ठेवून उर्वरित रक्कम तातडीने मला माझ्या मोबाईल नंबरवर पाठवा, अशी मागणी करत आहे. यामध्ये बुकींगसाठी २ हजार किंवा ६ हजार रूपयांऐवजी २० हजार किंवा ६० हजारापर्यंतची रक्कम पाठवून जादा गेलेली रकमेची मागणी करत आहे. मात्र सदर रक्कम आपल्याकडे जमा झालेली दिसून येत नाही असे सांगितल्यावर बँकेतून आपल्या खात्यामधील रक्कम कट झालेला बोगस मोबाईल मॅसेजही तो पाठवत आहे. या जोडीला आपण आर्मी मॅन असून चुकून जादा रक्कम आपल्याकडे गेली असून मला उर्वरित पैशाची तातडीने गरज असल्याचे तो सांगत आहे. परिणामी सदर हॉटेल, लॉज किंवा होमस्टे मालक तातडीने पैसे पर पाठवल्यानंतर यातून फसवणुकीचा प्रकार घडत पडत असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, यातील बहुतांशी हॉटेल व लॉज, होमस्टे मालकांना या बोगस व्यक्तीची सुरू असलेली ही फसवणूक लक्षात आल्याने सावधानता बाळगली जात आहे. एवढेच नव्हे तर काहींनी पैसे पाठवण्याचीही तयारी केली असताना दुसऱ्या सहकाऱ्याने ही फसवणूक असल्याचे लक्षात आणून दिल्यावर याला बळी पडण्यापासून वाचवले आहेत. तसेच काही बोगस व्यक्ती रात्री आपण प्रवासात असून या प्रवासामध्येच जादा रक्कम पाठवून आता आमच्याकडे पेट्रोल भरण्यासाठी पैसे नसून जादा गेलेली रक्कम तातडीने माझ्या मोबाईल पाठवा, असेही सांगत आहेत. मात्र अशामध्ये बँकांही. गुगल पे, फोन पे या मागनि येणारी रक्कम सेटलमेंट करण्यासाठी तीन तासापेक्षा जास्त किंवा दुसऱ्या दिवसाचा कालावधी घेत असल्याने होणाऱ्या फसवणुकीपासून दिलासा मिळत आहे. मात्र या बोगस रूम बुकींग स्कॅमपासून सावधान व सतर्क रहा, असे आवाहन प्रशासन करत आहे.