
रामदास आठवले शुक्रवारी रत्नागिरीत
रत्नागिरी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले येत्या शुक्रवारी (दि. २० सप्टेंबर) रत्नागिरीत येणार आहेत. रत्नागिरीतील हॉटेल विवेक येथे रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी बारा वाजता हा मेळावा सुरू होईल. या मेळाव्याकरिता आठवले रत्नागिरीत येणार आहेत. या मेळाव्यात आठवले यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे आणि कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके भूषविणार आहेत. तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे करणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून पक्षाचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष विलास कांबळे जबाबदारी निभवणार आहेत.