
जयगड येथे 51 वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड बौध्दवाडी येथे एका वृध्दाने घराच्या टेरेसवर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जयगड पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील नामदेव सावंत (51 रा. पेठ, बौध्दवाडी जयगड) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. कोणत्या तरी अज्ञात कारणातून त्यांनी राहते घरी टेरेसवर नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.40 वा.च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.