
मडगाव-पनवेल स्पेशल १५ ला धावणार
रत्नागिरी: चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी १५ सप्टेंबरला मडगाव-पनवेल गणपती स्पेशल चालवण्याचा निर्णय रेल्वेप्रशासनाने घेतला आहे.
त्यानुसार मडगाव-पनवेल गणपती स्पेशल १५ सप्टेंबरला धावेल. मडगाव येथून सकाळी ९.३० वा. सुटणारी स्पेशल पनवेल येथे त्याच दिवशी रात्री १२.१५ वा. पोहचेल. परतीच्या प्रवासात १५ सप्टेंबरला पनवेल येथून रात्री ११.४५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वा. मडगाव येथे पोहचेल. २० एलएचबी डब्यांच्या स्पेशलला राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वरसह अनेक रेल्वेस्थानकात थांबे आहेत.