
सिध्दीविनायक नगर येथे रिक्षा स्टॉपचा शुभारंभ
रत्नागिरी : शहरातील शिवाजीनगर येथील सिध्दीविनायक नगर रिलायन्स मॉलबाहेर किरणोदय शिवसेना प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेच्या स्टॉपचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन शेट्ये, ज्येष्ठ माजी नगरसेवक सुदेश मयेकर, शिवसेना शहर संघटक सौरभ मलुष्टे, दीपक पवार यांच्या उपस्थित या थांब्याच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी किरणोदय शिवसेनाप्रणित संघटनेचे शहराध्यक्ष रशिद हकीम, कार्याध्यक्ष संतोष सावंत, उपशहरप्रमुख इरफान खान यांच्यासोबत सिध्दीविनायक स्टॉपचे अध्यक्ष गणेश शिंदे, उपाध्यक्ष मुन्ना मापारी, सचिव प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रवाशांना उत्कृष्ट सेवा पुरवण्यात यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.