
मिरजोळे पाटिलवाडी येथील हातभट्टीवर धाड
रत्नागिरी: शहरानजिकच्या मिरजोळे पाटिलवाडी येथील हातभट्टीवर शहर पोलिसांनी धाड टाकत 16 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई गुरुवार 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12.15 वा. करण्यात आली.
शहर पोलिसांना मिरजोळे पाटिलवाडी येथे गावठी हातभट्टी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी तिथे धाड टाकली असता त्यांना 700 लिटर गूळ मिश्रित कुजके रसायन, 20 लिटर गावठी दारू आणि इतर साहित्य मिळून आले. याप्रकरणी संशयितविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ब ) (क ) (ड ) (फ ) (ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.