
नागावेच्या मंदिर दानपेटीतून सहा हजार रुपयांची चोरी
चिपळूण: अलोरे पाठोपाठ नागावे-कुंभारवाडी येथील सुकाई ग्रामदेवतेच्या मंदिरातील दानपेटी फोडून सहा हजार रुपयांची चोरी झाली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश महादेव पालांडे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायं. ६.४५ च्या मुदतीत ही चोरी झाली असून चोरट्याने दानपेटीचे वेल्डींग कोणत्यातरी हत्याराने उचकटून दानपेटीतील सहा हजार रुपये चोरले. याच भागातील अलोरे परिसरातील ग्रामदेवतेच्या मंदिरातील चोरीप्रकारणी कृष्णा काजवे याच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाच नागावे येथील चोरी पुढे आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.