
स्पेशलच्या धावणार चार अनारक्षित फेऱ्या
खेड : गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर बुधवारी धावलेल्या सीएसएमटी मुंबई-कुडाळ अनारक्षित स्पेशलला चाकरमान्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. स्पेशलच्या ४ अनारक्षित फेऱ्या धावणार असल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. सीएसएमटी मुंबई-कुडाळ स्पेशल शुक्रवारी दुपारी ३.३० वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वा. कुडाळ येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात ५ व ७ सप्टेंबरला धावणारी स्पेशल कुडाळ येथून पहाटे ४ वा. सुटून त्याचदिवशी सायं. ४.४० वा. सीएसएमटीला पोहचेल.