
चिपळुणात मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न
चिपळूण : अलोरे परिसरातील ग्रामदैवतेच्या मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगळवारी एकावर अलोरे-शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कृष्णा नारायण काजवे (३७, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद बापू शामलिंग गुरव (४५, चिपळूण) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलोरे-देऊळवाडी येथे गंगादेवी या ग्रामदैवतेचे मंदिर आहे. असे असताना ३ सप्टेंबर रोजी कृष्णा काजवे यांनी या मंदिरातील दानपेटीला असलेले कुलूप दगडाने तोडून चोरी प्रयत्न करत होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.