
दुचाकीला धडक दिल्या प्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील लोटेनजीक चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक देवून जखमी केल्याप्रकरणी चारचाकी चालक पवनकुमार सुरेश प्रसाद यादव (38, सध्या रा. घाणेखुंट-तळेवाडी, मूळ गाव बिहार) याच्यावर सोमवारी रात्री उशिरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील दुचाकी विनोद राजबहर (रा. पिरलोटे-खेड, मूळगाव उत्तरप्रदेश) हे दुचाकीवरून (एम.एच.08/ए.के. 9380) जात असताना समोरून येणाऱ्या कमांकाया इसुजु कॅप गाडीने (एम.एच.08/ए.पी.2881) धडक देत गंभीर दुखापत केली. दोघांचेही नुकसान केले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.