मुलींशी गैरकृत्य प्रकरणी शिक्षकाला न्यायालयीन कोठडी
संगमेश्वर : तालुक्यातील वांद्री येथील शाळेत कार्यरत असलेल्या संजय मुळ्ये या नराधम शिक्षकाने शाळकरी मुलींशी गैरकृत्य केल्यानंतर ग्रामस्थांचा उद्रेक झाला होता. या ठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल होत त्याला अटक केली होती. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 31 ऑगस्ट रोजी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज मंगळवार 3 रोजी त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.