मजगांव तंटामुक्त अध्यक्ष पदी सलग बाराव्यांदा बरकतअली मुकादम यांची बिनविरोध निवड
रत्नागिरी : शहरां पासून जवळच असलेल्या मजगांव येथील समाजसेवक बरकत मुकादम यांची नुकतीच बाराव्यांदा तंटामुक्त अध्यक्ष म्हणून ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीचे सरपंच फय्याज मुकादम, उपसरपंच शरीफ इब्जी, ग्रामसेविका, ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या साक्षीने पुन्हा एकदा जबाबदारी स्वखुशीने स्वीकारली.
बरकतअली मुकादम गांवातील समस्या अशा पद्धतीने हाताळतात की तंटाच उद्भवत नाही. अनेक समस्या चुटकी सरशी सोडवतात. छोट्या पासून मोठ्या पर्यंत व्यक्तींची मने जिंकण्याची त्यांच्या कडे उत्तम कला आहे.
प्रत्येक गरजू व्यक्तीस मदत करणे, लोकांच्या अडीअडचणी सोडविणे या मुळे ते गांवातच नव्हे तर पंचक्रोशीत सर्वांचे लाडके मित्र झाले असल्याने या पदावर त्यांना प्रत्येक वर्षी बिनविरोध आदराने अध्यक्ष पदावर विराजमान झाल्याने ग्रामस्थांनाही अत्यंत आनंद होतो. ते मजगांव चे माजी सरपंच ही आहेत.
त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच त्यांच्या मित्रमंडळीने त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.