पादचारी महिलांना धडक देणाऱ्या अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा
लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे दोन पादचारी महिलांना अज्ञात वाहनाने धडक देऊन पळ काढल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती. या अपघातात समिता शिंदे (२५) आणि नियती चंद्रकांत शिंदे (१९, दोघीही रा. वेरवली बु. बेर्डेवाडी). दोघींनाही उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. याबाबत १ सप्टेंबर रोजी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघीही महिला लांजा येथे कामानिमित्त आलेल्या आल्या होत्या. त्या सायंकाळी वेरवलीत बसमधून उतरून त्या रस्त्याने डाव्या बाजूने चालत जात असताना एका अज्ञात चारचाकी कारने त्यांना जोरदार धडक दिली. जबर धडकं बसल्याने दोघींही रस्त्यावर आदळल्या. आरडा ओरडा होताच अज्ञाताने तेथून पलायन केले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी वाहन चालकाविरोधात समिता यांनी फिर्याद दिली आहे.