
पानवल येथे एस टी बस घसरली
रत्नागिरी:
रत्नागिरी पानवल घवाळीवाडी बस उतारामध्ये चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे रस्त्याच्या बाजूला कलंडली. रस्त्याच्या खाली असलेल्या रेशन दुकानात लगत ही दुर्घटना घडली. परंतु झाडीमुळे ही बस अडकून राहिली त्यामुळे कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही. बस मध्ये एकही प्रवासी नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला.