
विद्यार्थीनिशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाई करावी
महिला भाजपाचे संगमेश्वर पोलिसांना निवेदन
संगमेश्वर :तालुक्यातील वांद्री येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकानेच तीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने जिल्हा हादरला आहे. ज्या वयात मुलीनी खेलायच, बागडायच त्याच वयात नराधमाने त्यांची शिकार केली. अशा या नारधमाची तातडीने चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी असे निवेदन महिला भाजपच्या वतीने संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना भाजपच्या रत्नागिरी जिल्हा महिला चिटणीस कोमल रहाटे, ज्येष्ठ नेत्या माधवी भिडे, करमरकर व दीपिका जोशी उपस्थित होत्या.