
शिरगाव येथे महिलेला मारहाण सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी : शहरानजीकच्या शिरगाव नाखवा मोहल्ला येथे अज्ञात कारणातून सात जणांनी मिळून महिलेला शिवीगाळ केली तर त्यातील तिघांनी तिला मारहाण केली. ही घटना शनिवार 31 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास घडली.
शिरीन नाखवा, एजाज नाखवा, खैरुन नाखवा, आतिफा नाखवा, आफ्रीन नाखवा, अरसलान नाखवा (सर्व रा.शिरगाव नाखवा मोहल्ला,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पिडीत महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित सात जणांनी शनिवारी दुपारी त्यांच्या घरासमोर जाउन त्यांना शिवीगाळ केली. तर यातील इमरान नाखवा व अरसलान नाखवा यांनी तिला हातातील लाकडी काठीने मारहाण केली. त्यानंतर शिरीन नाखवा हिने फिर्यादी महिलेच्या नाकाला चावा घेत दुखापत केली. तक्रारीवरुन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.