
राजधानी एक्स्प्रेसमधून ३ लाखाचे मोबाईल लंपास
खेड: कोकण रेल्वे मार्गावरील खेड नजीकच्या अंजनी रेल्वे स्थानकात क्रॉसिंग साठी थांबलेल्या राजधानी एक्स्प्रेस मधून प्रत्येकी दीड लाख रुपये किमतीचे असे दोन १४ प्रो मॅक्स अँपल कंपनीचे ३ लाख रुपये किमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ जुलै रोजी घडली होती.
या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुदत्त प्रभाकर शेनोई रा गुजरात यांनी तक्रार दाखल केली. आहे ८ जुलै रोजी ते राजधानी एक्स्प्रेस ने प्रवास करत असताना मध्यरात्री ३.१५ वाजता गाडी क्रॉसिंग साठी थांबली असताना अज्ञात चोरट्याने बॅग मधील दोन मोबाईल फोन चोरून नेले.