
कशेडी घाटात अपघात, दुचाकीस्वार ठार
खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दीत मुंबई बाजूकडून खेड दिशेने जाणार्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सोहेल साळुंखे (वय २६ रा. ताकोली मोहल्ला कळवा, ठाणे) हा तरुण मुंबईकडून खेड दिशेने जात होता. कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दीत आला असता दुचाकीला अपघात झाला. अज्ञात वाहन त्याच्या डोक्यावरून गेल्याने घटनेची माहिती पोलादपूर व कशेडी पोलिसांना समजतात पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर अपघात हा नेमका कशामुळे घडला? याबाबत नेमकी वस्तुस्थिती समजून आली नाही. अज्ञात वाहनाचा तपास पोलीस करत आहे.