
कोळसरे येथे तरुण मद्यपीवर गुन्हा
रत्नागिरी : तालुक्यातील कोळसरे वरचीवाडी येथील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत जाणाऱ्या मद्यपीविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश अरविंद आग्रे (२३) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २५) रात्री सव्वादहाच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरिश हा रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.