पोमेंडी येथील कृषी विभागाचे ग्रील उचकटून चोरी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पोमेंडी कृषी विभागाच्या हद्दीत चोरट्यांनी डल्ला मारत कॉम्प्युटर युपीएस असे साहित्य शुक्रवारी सायंकाळनंतर चोरुन नेले. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पोमेंडी येथील कृषी विभागाच्या ऑफिसमध्ये चोरी झाल्याची फिर्याद सारिका भिमराव पाटील (वय 40) यांनी दिली असून ऑफिसच्या स्लायडिंगच्या खिडकीच्या बाहेरील लोखंडी ग्रील उचकटून स्लायडिंगची खिडकी सरकवून आतमध्ये प्रवेश करुन कॉम्प्युटर, युपीएस तसेच साऊंड सिस्टीम चोरुन नेले.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 331 (3) 331 (4) आणि 305 अन्वये गुन्हा दाखल केला असून शहर पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.