
श्रीराम मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या मंगळागौरच्या स्पर्धेत सखी ग्रुपने पटकवीला प्रथम क्रमांक….
रत्नागिरी – श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान व श्रीराम मंदिर देवस्थानाच्या संयुक्त विद्यमाने श्रावणमास निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला श्रीराम मंदिरात संपन्न झालेल्या या मंगळागौर स्पर्धेत सखी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकवीला असून या ग्रुपला सौ. राजवर्धिनी विराज घोसाळकर यांच्या हस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले. यावेळी सोबत माजी आमदार बाळासाहेब माने, सौ माधवी माने,श्री मिहीर माने, श्री.विराज माने, ॲड.विनय आंबूलकर, ॲड.सौ शाल्मली आंबूलकर सौ. उर्मिलाताई घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते….