
बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी ः बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. रोहिदास हरिश्चंद्र मोंडकर (वय ५२, रा. भगवती बंदर, राजवाडी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २२) रात्री अकराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहिदास मोंडकर हे कंपनीत कामाला गेले नाहीत म्हणून कंपनीतील काही लोक त्यांना बघण्यासाठी घरी आले होते. त्यावेळी त्यांच्या घरातील दरवाजा उघडा दिसला म्हणून आत जाऊन पाहिले असता त्यांना मोंडकर हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. तात्काळ त्यांनी रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.