
खेडमध्ये मटका जुगार अड्ड्यावर धाड
खेड : शहरातील जसनाईक कॉम्प्लेक्समध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी धाड टाकून २,२२० रूपये जप्त केले. या प्रकरणी नीलेश महेंद्र शिगवण (रा. भडगाव-उसरेवाडी) याच्यावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो एका दैनिकात प्रसिद्ध होणाऱ्या शुभ अंकावर पैसे लावून मटका जुगाराचा खेळ खेळवत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
लोटेमाळ येथेही अड्ड्यावर धाड, एकावर गुन्हा तालुक्यातील लोटेमाळ-माळवाडी येथे येथील पोलिसांनी मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून एकास रंगेहाथ पकडले. रोख रकमेसह जुगाराचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले. कृष्णा बंडू जाधव (रा. ईटवाडी-बीड, सध्या लोटेमाळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तो एका दुकान गाळ्यात लोकांकडून पैसे स्वीकारत मटका जुगाराचा खेळ खेळवत होता.