
रत्नागिरी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत झाडगाव येथील छञपती शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश
7 खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेत
रत्नागिरी : सध्या सर्वत्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धांचा हंगाम सुरू आहे. तालुकास्तरीय स्पर्धेपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत तथापी खेलो इंडिया स्पर्धेपर्यंत प्रत्येक खेळाडू आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत असतो. या पार्श्वभूमीवर या वर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी स्टेडियम रत्नागिरी आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर’ संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव रत्नागिरी येथील खेळाडूंनी सुयश संपादन केले आहे.
या तालुकास्तरिय कुस्ती स्पर्धेमध्ये छञपती शिवाजी हायस्कूलमधील विजयी झालेल्या 14 वर्षाखाली रुद्रा अजित चव्हाण हिने 33 kg वजनी गटातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. 35 kg वजनी गटात प्रथम क्रमांक साईराम महीपती जाधव, द्वितीय क्रमांक चेतन रंगराव पाटील, 38 kg वजनी गटातून द्वितीय क्रमांक दर्शन सुरेंद्र गावडे, 38 kg वजनी गटात तृतीय क्रमांक सुदर्शन बाळासो खोत, 41 kg वजनी गटात प्रथम क्रमांक वेदांत रामदास खोत, 44 kg वजनी गटात प्रथम क्रमांक हर्ष रवी बैरागर, 62 kg वजनी गटात प्रथम क्रमांक आर्यन रमेश चव्हाण, 68 kg वजनी गटात प्रथम क्रमांक विकास चंद्रकांत पाटील याने पटकावला आहे.
तसेच 17 वर्षाखाली व 45 kg वजनी गटात प्रथम क्रमांक राजेश अरुण रब्बी, द्वितीय क्रमांक योगेश बाळासो खोत, 51 kg वजनी गटात द्वितीय क्रमांक तेजस शंकर धोत्रे, 92kg वजनी गटात द्वितीय क्रमांक आदित्य अजित शिंदे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेल्या तब्बल 7 खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक स्वतः कुस्तीपटू असलेले श्री एम. डी. पाटील, शिक्षक तानाजी गायकवाड, शिक्षक दीपक पाटील, शिक्षक अशोक सुतार, शिक्षक अमोल मंडले, सागर कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अभयकुमारजी साळुंखे साहेब, सचिवा सौ शुभांगी गावडे मॅडम गावडे, आजीव सेवक तथा कोल्हापूर विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, विद्यालयाचे थोर देणगीदार सुनिलशेठ भोंगले, सामाजिक कार्यकर्ते व देणगीदार नितीन जाधव, रोटरी क्लबच्या शाल्मली आंबूलकर, संस्थेचे आजीवसेवक व रत्नागिरी जिल्हा संपर्क निरीक्षक हुसेन पठाण, मुख्याध्यापक श्री ए. डी. पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रीतम पिलणकर व अशोक पवार, शिक्षक पालक व माता पालक संघ उपाध्यक्ष वैशाली मापुस्कर यांच्याबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे सर्व शिक्षक या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.