
राजापूरच्या स्वच्छता कर्मचार्याची स्वच्छता निरीक्षकपदी निवड
राजापूर:- राजापूर पालिकेतील स्वच्छता कर्मचारी प्रमित प्रकाश जाधव यांची स्वच्छता निरीक्षकपदी निवड झाली आहे. राज्य सेवा आयोगामार्फत ही निवड झाली आहे.
प्रमित जाधव राजापूर पालिकेत ७ नोव्हेंबर २०१९ पासून आरोग्य विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची रत्नागिरी पालिकेत स्वच्छता निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. आजपासून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
प्रमित यांनी सफाईचे काम करत असतानाच स्वच्छता निरीक्षक या पदाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला होता. असंख्य अडचणींवर मात करत प्रमित यांनी स्वच्छता निरीक्षकपदाला गवसणी घातल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होतं आहे. जाधव यांना राजापूरचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले आणि अन्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.