
मंकिपॉक्स आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क
रत्नागिरी : सध्या देशात नसला तरी जगातील विविध देशात मंकीपॉक्स या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. स्वीडन व पाकिस्तान या देशांनी मंकीपॉक्स बाधित रुग्ण नोंदवले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभाग मात्र सतर्क झाला आहे.
मंकीपॉक्स बाबत नागरिकांनी घाबरून जावू नये. मंकीपॉक्स हा आजार आपल्या देशात किंवा राज्यात आत्तापर्यंत आलेला नाही. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना याबाबत वरिष्ठ स्तरावरून प्राप्त मार्गदर्शनपर सूचना दिलेल्या आहेत. परंतु खबरदारी म्हणून नागरिकांनी मंकीपॉक्स या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून परत आलेल्या प्रवासी नागरिकांना अशा प्रकारची काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे.
काय आहे मंकीपॉक्स आजार?
मंकीपॉक्स का आजार डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरामध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्रोत आहेत. या आजाराचा अधिशयन कालावधी हा 6 ते 13 दिवस तथापि 5 ते 21 दिवसापर्यंत असू शकतो. तर रुग्णाचा संसर्गजन्य कालावधी हा अंगावर पुरळ उठण्यापूर्वी 1 ते 2 दिवसापासून ते त्वचेवरील फोडावरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्ण पणे मावळेपर्यंत, (बाधित व्यक्ती इतर व्यक्तिसाठी संसर्गजन्य असतो).