
काडवलीत एकास मारहाण, तिघांवर गुन्हा
खेड:- तालुक्यातील काडवली-गजवाडी येथे घरात घुसून शिवीगाळ करत बॅटने मारहाण केल्याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक लक्ष्मण वारणकर, रामचंद्र सखाराम वारणकर यांच्यासह एका महिलेचा समावेश आहे. या तिघांनी फिर्यादीच्या घरात घुसून खेचत बाहेर आणत मारहाण केली. तसेच पायापासून छातीपर्यंत रस्सी गुंडाळून फिर्यादीला लाकडी मेढीला बांधत मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.