
बसस्थानक येथील मटका जुगारावर पोलिसांची धाड
रत्नागिरी:- शहरातील बसस्थानक समोरिल एका बंद टपरीच्या आडोशाला मटका-जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज गजानन सुवरे (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास बसस्थानक समोरिल एका बंद टपरीच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर बसस्थानक समोरील बंद टपरीच्या आडोशाला मटका-जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.