
गणपतीपुळे येथे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन
रत्नागिरी:- तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे एका हॉटेलच्या समोरिल सार्वजनिक ठिकाणी प्रौढाने मद्य प्राशन केले. या प्रकरणी संशयित प्रौढाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेंद्र राजाराम रामानी (वय ४०, रा. कुणबीवाडी, नेवरे भंडारपुळे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास गणपतीपुळे येथील सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी देशी दारुची बाटली पुढ्यात घेऊन बसलेला पोलिसांनी आढळला. या प्रकरणी पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.