
रत्नागिरी जिल्ह्यातील कौशल्य असलेल्या मुलांना जर्मनीत रोजगाराची संधी
तरुण तरुणींनी नावनोंदणी करण्याचे आवाहन
रत्नागिरी :कौशल्य असलेल्या मुलांना जर्मनी येथे रोजगाराची संधी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आह़े. यासंबंधी महाराष्ट्र शासन व जर्मनी येथील बाडेन बुटेनबर्ग यांच्यात सामंजस्य करार झाला आह़े. लवकरच राज्यातील 10 हजार मुलांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देवून जर्मनी येथे पाठविले जाणार आह़े. तरी या रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील तरुण तरुणींनी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा शिक्षण व पशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर यांनी केले आह़े.
जर्मनी सारख्या प्रगत देशामध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आह़े, तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध आह़े, अशा युवकांना युरोपिय देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकतात़. हीच बाब लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी करार केला आह़े. राज्यातील कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करुन उपलब्ध करुन देण्यात येणार आह़े. यासंबंधी 11 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे शिवलकर यांनी सांगितले.
जर्मन भाषा शिकण्यासाठी 4 महिन्यांचा कोर्स ठेवण्यात आला आह़े. राज्यस्तरावर 25 विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे 10 हजार विद्यार्थ्यांसाठी 400 प्रशिक्षण वर्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आह़े. जर्मन भाषेचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी देखील नाव नोंदणी करावी असे आवाहन शिवलकर यांनी यावेळी केल़े.
रोजगाराच्या संधी उपलब्ध असलेल्या क्षेत्रांमध्ये परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओलॉजी सहाय्यक, दंतचिकित्सा सहाय्यक, आजारी व वृद्ध व्यक्तींचा काळजीवाहक दस्तऐवज व कोडींग, वैद्यकीय लेखा व पशासन, सेवक, वेटर, स्वागतकक्ष संचालक, स्वयंपाकी, हॉटेल व्यवस्थापक, लेखाधिकारी, स्वच्छक, गोदाम व्यवस्थापक, विक्री सहाय्यक, इलेक्ट्रिशन, रंगकर्मी, सुतार, गवंडी, नळ जोडणी (प्लंबर), मॅकॅनिक, वाहनचालक, सुरक्षा रक्षक, टपाल सेवा, सामान बांधणी व वाहतूक, विमानतळावर सामान हाताळणी इत्यादींचा समावेश असणार आह़े तरी जर्मनी येथे नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन सुशील शिवलकर यांनी केल़े. पत्रकार परिषदेला नम्रता शेजाळ, राहूल बर्वे राजेंद्र लठ्ठे आदी उपस्थित होत़े