
मनसे रत्नागिरी शहर संघटना बांधणी ला जोर विभागअध्यक्षपदी नवनियुक्त्या जाहीर
रत्नागिरी :आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष वाढीच्या दृष्टीरने सन्मा.नेते अविनाशजी अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनात,जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर व शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी सोमवारी रत्नागिरी शहरात नवनियुक्त्या जाहीर केल्या.
यामध्ये शोहेब शेख, शैलेश मुकादम व सिद्धेश धांघट यांची विभागअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात
आली आहे.लवकरच शहरातील उर्वरित पदांच्या नियुक्त्या ही जाहीर होणार असल्याचे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहर संघटक अमोल श्रीनाथ, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, उपशहरअध्यक्ष इम्रान नेवरेकर, उपशहरअध्यक्ष राजेश नंदाणे, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव, शाखाध्यक्ष राहुल खेडेकर आदि महाराष्ट्रसैनिक सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.