
पिसई येथे अवैध दारू प्रकरणी एकावर गुन्हा
दापोली:- दापोली तालुक्यातील पिसई काटकरवाडी येथे भरत भिकाजी येसावरे याने अवैधरित्या दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत येसावरे हा पिसई काटकरवाडी परिसरात संशयितरित्या आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे विनापरवाना हातभट्टीची दारू आढळून आली. यामध्ये रॉयल स्टॅग या विदेशी दारूच्या १८० मि.ली.च्या ३, मॅक्डोवेल्स या विदेशी दारूच्या १८० मि.ली.च्या २ काचेच्या सीलबंद बाटल्या, जीएम देशी दारूच्या १८० मि.ली.च्या ७ प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या असा सुमारे १३३० रुपयाचा माल आढळून आला. याप्रमाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.