
जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक
खेड:- सुरत, गुजरात राज्यातून बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा व क्रिप्टओ करन्सीव्दारे ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या भामट्यास गजाआड करण्यात खेड पोलिसांना यश आले आहे
नारायानलाल शंकरलाल जोशी (वय 42 वर्ष) सध्या राहणार ८४, भावना पार्क १, गोडदरा, सुरत गुजरात मुळ राहणार पोस्ट प्लास्मा, गाव गुजरो का गुढा तहसील शायरा जिल्हा उदयपूर राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या त्या भामटयाचे नाव आहे.
१९ एप्रिल ते २४ मे २०२४ या कालावधीत ए आर के लर्निंग ग्रुप या व्हॉटसॲप ग्रुपवरील ट्रेडींग संदर्भातील गोष्टी मोबाईल क्रमांकावरुन येणा-या व्हॉटसॲप मेसेज द्रवारे फिर्यादी यांना ARK Investment Group या कंपनीमध्ये पैश्याची गुंतवणूक करुन जास्तीत जास्त रकमेचा परतावा देण्यात येईल असे सांगून फिर्यादी यांची अनोळखी इसमांनी २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती या प्रकरणी खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या अपहरित रकमेचा तपास करता एकूण अपहरित रक्कम २४ लाख ८५ हजार पैकी १० लाख रुपये रक्कम ही पंजाब नॅशनल बैंक पायल साडी सेंटर द्वारे जमा झालेली असल्याचे निष्पन्न झालेले होते. सदर अकाउंट धारक संशयित उदयपूर राजस्थान व सुरत गुजरात येथे शोध घेता अकाउंट धारक हा मिळून आलेला नाही तसेच अकाउंट धारक हा वेळोवेळी गुंगारा देत होता परंतु प्रत्यक्षात कधीही समोर आलेला नाही.
आरोपी हा तांत्रिक व स्थानिक गोपनीय माहितीच्या आधारे सुरत येथील भावना पार्क येथे राहत्या घराच्या आवारात एका अनोळखी इसम यांचेकडून बँक खाते व त्याचे किट (चेक बुक, एटी एम व बँकेशी सल्लंग्न असणारे सिम कार्ड) घेणे करीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने तसा सापळा रचून आरोपी त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या
त्या भामट्याने यापूर्वी देखील असे गुन्हे केले असल्याचे तसेच स्वतःचे व इतरांचे बँक खाते वापरुन क्रिप्टओ करन्सी मध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून लोकांची फसवणूक केली असल्याचेनिष्पन्न झालेले आहे. अद्याप पर्यंत सुमारे एक कोटी रुपये पेक्षा जास्त फसवणूक केलेली असल्याचे व लोकांचे अकाउंट शुल्लक आमिष पोटी घेऊन त्याव्दारे फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
त्याच्यावर दिल्ली, बंगलोर, महाराष्ट्र या ठिकाणी गुन्हे दाखल असून कोणत्याही खोटा व्यापार असल्याचे दाखवून बँक खाते उघडून सदर बँक खात्यास प्राप्त होणारे अनलिमिटेड ट्रान्सकक्षन ५ लाख या सेवेव्दारे लाखोंची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून एक मोबाईल सिम कार्ड, पंजाब नॅशनल बँक अकाऊंट चे चेक बुक, बँक ऑफ बडोदा अकाऊंटचे पासबुक आदी साहित्य जप्त करण्यात आले
या कारवाई मध्ये खेड चे पोलिस निरिक्षक श्री. नितीन भोयर, पोउनि श्री. श्रीकृष्ण येवले. दिपक गोरे. राम नागुलवार. वैभव ओहोळ रमिज शेख, निलेश शेलार, सौरभ कदम (सायबर पोलीस ठाणे) आदींचा समावेश होता