
खेडशी येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- छातीत दुखू लागलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. मंदार प्रभाकर कुवेसकर (४४, रा. पुष्पेंद्र सिटी, खेडशी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ६) रात्री अकराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंदार यांना रहातेघरी छातीत दुखू लागले त्यांना खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.