
कचरा टाकायला गेलेल्या चार वर्षाच्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू
दापोली : तालुक्यातील वाकवली नवानगर गिरण गावातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. नदीत बुडून साडेचार वर्ष मुलाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना १६ ऑगस्ट शुक्रवार सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून सिरजल कमल भूजल असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद गणेश भजन यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश भुजल नेहमीप्रमाणे कामावर गेले होते दरम्यान आठ वाजता त्यांच्या पत्नीने कॉल करून आपला मुलगा सिरजल नदीच्या पाण्यात पडल्याची माहिती दिली यानंतर कमल हे घरी परत येऊन तातडीने मुलाला खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र सिरजलची प्रकृती अधिकच खालावल्याने डॉक्टरांनी आपल्या गाडीतून सीरजला दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेले कमल यांच्या पत्नीने मुलगा सीरजल याला कचरा टाकण्याकरिता पाठवले होते तो बराच वेळ आला नाही म्हणून तीने आरडाओरड सुरू केली.गावातील माजी पोलीस पाटील गणपत आंबेकर, मनोज कोळेकर यांची पत्नी आणि अनिता मोहिते यांनी शोधाशोध सुरू केली .शोधा शोध सुरू असताना मुलगा घराजवळील नदीच्या पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून खाजगी दवाखान्यात नेले डॉक्टरांनी तपासून साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिरजल मृत्यू झाल्याचे घोषित केले. दापोली पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली