बॅटऱ्या चोरीप्रकरणी तिघांना अटक
गुहागर : तालुक्यातील आरे येथील श्री धारदेवी मंदिराजवळील असलेल्या मोबाईल टॉवरच्या शेल्टर रूममधील ९२ हजारांच्या २४ इन्व्हर्टर बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
गुहागर पोलिस ठाण्यामध्ये गुरुवारी (ता. १५) रात्री याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रोहित प्रसाद देवकर (वय २७), सिद्धांत स्वप्नील भोसले (वय २१, रा. आरेगाव), विवेक संतोष मालगुंडकर (रा. पालपेणे मधलीवाडी) या तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये १२ ऑगस्टला सायंकाळी ५ ते १५ ऑगस्टला सकाळी ११.१५ वाजण्याच्या दरम्याने तालुक्यातील आरे गावातील श्री धारदेवी मंदिरानजीक असलेल्या व्हीआय, जीओ आणि बीएसएनएल टॉवरचे शेल्टर रूममध्ये असलेल्या टॉवर व्हिजन इंडिया कंपनीकडून आलेल्या २४ इन्व्हर्टर बॅटऱ्या अज्ञाताने शेल्टर रूमचा दरवाजा हत्याराने उचकटून काढून चोरून नेल्या. या बॅटऱ्यांची ९२ हजार किंमत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.