
हातखंबा येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरानजीकच्या हातखंबा येथील एका ढाब्याजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. संतोष सखाराम वेद्रे (वय ४५, रा. करबुडे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना ४ ऑगस्टला रात्री नऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष वेद्रे हा ईश्वर ढाबा येथे बेशुद्ध अवस्थेत होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता. स्थानिक ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गुरुवारी (ता. १५) ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.