
सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन ; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील नाणीज-शिवगणवाडी येथे काजूच्या झाडाखाली विदेशी मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश शिवराम शिवगण (रा. नाणीज शिवगणवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश नाणीज येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना आढळला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.