
पावस परिसरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे
रत्नागिरी: पावस परिसरामध्ये सध्या चोऱ्या, खुनाच्या घडत आहेत. त्याला आळा बसावा व तपासासाठी मदत व्हावी यासाठी पावस परिसरामध्ये १२ सीसीटीव्ही कॅमेरे लोकसहभागातून बसविण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणी येत्या काही दिवसांत बसवले जाणार आहेत.
पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये रत्नागिरी पोलिस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार ऑपरेशन नेत्रा या कार्यक्रमांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यामध्ये अनेक मुख्य रस्ते, मंदिरे, मशीद, आदी ठिकाणी सुमारे १४० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील अनेक गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी कॅमेऱ्यांचा उपयोग झाला आहे. तो अधिक बळकट होण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी आवाहन केल्यानंतर लोकसहभागातून पावस गाडी अड्डा, हॉटेल आराध्य व गोळप, आदी ठिकाणी आणखी बारा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असू, न या मार्गावरील सर्व हालचाली या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्यात येणार आहेत.
या संदर्भात सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळुंखे म्हणाले, सध्या महत्त्वाच्या ठिकाणी लोकसभागातून बारा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित कोळंबे, मेवीं, गावखडी आदी ठिकाणी लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य रस्ते व मुख्य ठिकाणांवर नजर राहणार आहे. जेणेकरून पोलिस तपास कार्यामध्ये मदत होईल.
दोन महिन्यांपूर्वी या परिसरात दोन भावांचा खून झाला. त्यांचा शोध निव्वळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शक्य झाला. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे.