
भूमिका समजून घेऊन जबाबदारी पार पाडा : जयंतप्रकाश गुरव
”नवनिर्माण हाय”मध्ये ”इन्वेस्टीचर सेरेमानी” उत्साहात
रत्नागिरी : आपल्या कामाच्या अधिकार कक्षांच्या बाहेर न जाता आपल्या कामाची भूमिका काय आहे हे समजून घेऊन ती जबाबदारी एका शिस्तीने पार पाडायची आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे, असा मोलाचा सल्ला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जयंतप्रकाश गुरव यांनी दिला.
रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (सीबीएससी) आयोजित ”इन्वेस्टीचर सेरेमानी”दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय पाटील, संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे उपस्थित होते. कार्यक्रमात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी वेगवेगळ्या हाऊसेसचे कॅप्टन म्हणून निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांकडे पदभार हस्तांतरित करण्यात आला.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री. पाटील यांनी कोणतेही पद ही खूप मोठी जबाबदारी घेऊन येते. नेतृत्वात एकाधिकारशाही न वापरता सगळ्यांना पुढे घेऊन जायचे असते, असे सांगितले. मुख्याध्यापक डॉ. पाटील, प्राचार्या डॉ. जगदाळे, संचालिका सौ. हेगशेट्ये यांनी मनोगत व्यक्त केले. २०२४-२५ या वर्षासाठी कारभार पाहणारे विद्यार्थी असे : अध्यक्ष – विधी कापडी (दहावी), कमांडर – मुईज वागळे (नववी), व्हाइस कमांडर- भार्गवी पवार (आठवी), अंबर कॅप्टन अंजल कृष्णा (नववी), व्हाइस कॅप्टन- ओम गुरव (आठवी), एमराल्ड कॅप्टन- मृदुला गुरव (नववी), एमराल्ड व्हाइस कॅप्टन- अमेय खामकर (आठवी), रुबी कॅप्टन- मुक्ता सुर्वे (नववी), रुबी व्हाइस कॅप्टन- संस्कृती कोकरे (आठवी), सफायर कॅप्टन- सिद्धेश गायकवाड (नववी), सफायर व्हाइस कॅप्टन- आराध्य मनोरकर (आठवी), स्पोर्ट कॅप्टन- यासीन कुरेशी (नववी), स्पोर्ट सफायर व्हाइस कॅप्टन- खुशियाल गुप्ता (आठवी), डीसिप्लिन कॅप्टन- आलिया खतीब (नववी), कल्चरल कॅप्टन- गार्गी चव्हाण (नववी).