
चिंचवलीमध्ये तरुणाची आत्महत्या
खेड:- तालुक्यातील चिंचवली- चांदेवाडी येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण प्रकाश पवार (३९) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही बुधवारी (ता. ३१ जुलै) उघडकीस आली. प्रवीण मागील दोन महिन्यापूर्वी पासून एकटाच राहात होता. घरातील एकटेपणाला कंटाळून घराचा मुख्य दरवाजा बाहेरुन कुलूप लावून बंद केला. त्यानंतर तो घराचे पाठीमागील दरवाजाने घरात येऊन लाकडी भालाला गळस घेतला, असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.