
जुगार अड्ड्यांवर चिपळुणात कारवाई
चिपळूण:- तालुक्यातील अलोरे-शिरगाव पोलिसांनी नुकतेच पोफळीनाका, पिंपळी-बुद्रुक येथे चालणाऱ्या जुगार आणि चिपळूण पोलिसांनी भोम-खालचीवाडी, खेर्डी येथे दारू अड्ड्यांवर कारवाई केली. तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश नारायण मोरे (५४, पोफळी- पवारवाडी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३१) दुपारी अडीचच्या सुमारास पोफळी नाका येथे निदर्शनास आली. संशयिताकडून पोलिसांनी साहित्यासह ५५० रुपये रोख जप्त केले. अक्षय विजय तांबट (३०, पिंपळी बुद्रुक-गजमलवाडी) हा पिंपळी बुद्रक येथे सायंकाळी साडेसात वाजता जुगार चालवताना सांपडला. त्याच्याकडून ५२० रुपये रोख व साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई अलोरे-शिरगाव पोलिसांनी केली. यशवंत राजाराम साळुंके (६५, भोम- खालचीवाडी) हा बुधवारी सायंकाळी ७ वाजता घराच्या पाठीमागे दारू विकताना सापडला. त्यांच्याकडून ७०० रुपये किंमतीच्या १० दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच खेडीं आठवडा बाजार परिसरात एकजण गावठी दारू विकताना सापडला. त्याच्यावरही पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.