
चिपळुणात जुगार, दारुअड्ड्यांवर कारवाई
चिपळूण: तालुक्यातील अलोरे-शिरगाव पोलिसांनी बुधवारी पोफळीनाका, पिंपळी-बुद्रुक येथे चालणाऱ्या जुगार तर चिपळूण पोलिसांनी भोम- खालचीवाडी, खेर्डी येथे दारू अड्ड्यांवर कारवाई केली.
उमेश नारायण मोरे (५४, पोफळी- पवारवाडी) हा पोफळीनाका परिसरात बुधवारी दुपारी २.३० वाजता जुगार चालवत होता. त्यांच्याकडून पोलिसांनी ५५० रूपये रोख व जुगार साहित्य, अक्षय विजय तांबट (३०, पिंपळी बुद्रुक-गजमलवाडी) हा पिंपळी बुद्रक येथे सायंकाळी ७.३० वाजता जुगार चालवताना सापडला. त्याच्याकडून ५२० रूपये रोख व साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई अलोरे-शिरगाव पोलिसांनी केली. तर यशवंत राजाराम साळुंके (६५, भोम-खालचीवाडी) हा बुधवारी सायंकाळी ७ वाजता घराच्या पाठीमागे दारू विकताना सापडला. त्यांच्याकडून ७०० रूपये किंमतीच्या संत्रा कंपनीच्या १० दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच खेर्डी आठवडा बाजार परिसरात एकजण गावठी दारू विकताना सापडला.