
फिनेल प्राशन केलेला तरुण रुग्णालयात
रत्नागिरी ः आंबेडकरनगर-देवरुख येथील तरुणाने अज्ञात कारणाने फिनेल प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आले आहे. उपचारानंतर त्याला सोडण्यात आले. अभिषेक मिलींद कदम (२४, रा. आंबेडकरनगर, देवरुख, ता. संगमेश्वर) असे फिनेल प्राशन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३१) दुपारी दोनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक याने कोणत्यातरी अज्ञात कारणाने फिनेल प्राशन केले. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर गुरुवारी त्याला सोडण्यात आले.